Friday 19 December 2014

*शिवराय*

.......... * शिवराय * ..........
धन्य ते शिवराय चला नमन त्यांना करू,
घडविले स्वराज्य स्वबळावर, केले एक सुराज्य सूरू ।।

घेतीले भवानीचे दर्शन , घेतली रायरेश्वरी शपत ।
झुगारीत सारी बंधने मार्गीला स्वराज्याचा विजयपथ ।।

लाख होते आक्रमक परि तो न डगमगला ।
जिंकिला तो सह्याद्री साद घातली गगनाला ।।

जिंकिला तो तोरणं राजगडाचे झाले रायगड ।
परि चित्ती होती त्याच्या मराठी जनमाणसाची ओढ ।।

कर्मठांच्या गर्दना उडविल्या, पडिल्या बंद त्या रिती ।
अन् 'साम दाम दंड भेद ' वापरली हि नीती ।।

दिली प्रेरणा संघर्षाची , अन्यायाशी लढण्याची ।
फिकीर नसे चित्ती त्याच्या कुण्या शत्रूच्या कापटकाव्याची ।।

रणी ठेवुनी होश दावीला मराठी जोष ।
अन् हर हर महादेवचा झाला सर्वत्रभू जयघोष ।।

असा होता वीर शिवाजी, तो आला त्याने जिंकिले ।
काळाने घाला केला , पण काळ मात्र आठवणीत राहिले ।।

-सिद्धेश्वर

No comments:

Post a Comment