Friday 19 December 2014

*स्वप्नांची कोरड *

......... *स्वप्नांची कोरड * ........
खूप काही करायचं होतं
काही मात्र करायचच राहीलं ।
नखशिखांत चिंम्ब झालो
मन मात्र कोरडच राहिलं... ।।
वाटा अनेक होत्या,
एकही मात्र सरली नाही ।
किनाऱ्याकडे जाणारी आता
लाट एकही उरली नाही... ।।
सांगायच होतं खूप काही
शब्दांनाच बोलणं जड झालं ।
गर्जना होण्यापूर्वीच
भयाण वादळ कुठून आलं… ।।
बहार्ण्यापुर्वीच श्रावण
वनव्यानं पेटलं रान ।
धुंदीत धुळीच्या या
कुठे हरवले हे भानं… ।।
रात्रीच्या कुशीत जीवन सरता
अंधाराचीच भीती वाटू लागली ।
उभ्या आयुष्यात नभाची
छाया गर्द दाटू लागली … ।।
सोबती न कुणी वाटेवरी
हात धरुनी चालावया ।
विरती ते क्षण हसरे
सोबती न कोणी डोलावया… ।।
कुठे चाललो आज मी
काय ठाव कुणास ।
चेहऱ्यावरती हसू मात्र
मन का हे उदास … ।।

- सिद्धेश्वर
 

No comments:

Post a Comment