Friday 19 December 2014

*स्वप्नांची कोरड *

......... *स्वप्नांची कोरड * ........
खूप काही करायचं होतं
काही मात्र करायचच राहीलं ।
नखशिखांत चिंम्ब झालो
मन मात्र कोरडच राहिलं... ।।
वाटा अनेक होत्या,
एकही मात्र सरली नाही ।
किनाऱ्याकडे जाणारी आता
लाट एकही उरली नाही... ।।
सांगायच होतं खूप काही
शब्दांनाच बोलणं जड झालं ।
गर्जना होण्यापूर्वीच
भयाण वादळ कुठून आलं… ।।
बहार्ण्यापुर्वीच श्रावण
वनव्यानं पेटलं रान ।
धुंदीत धुळीच्या या
कुठे हरवले हे भानं… ।।
रात्रीच्या कुशीत जीवन सरता
अंधाराचीच भीती वाटू लागली ।
उभ्या आयुष्यात नभाची
छाया गर्द दाटू लागली … ।।
सोबती न कुणी वाटेवरी
हात धरुनी चालावया ।
विरती ते क्षण हसरे
सोबती न कोणी डोलावया… ।।
कुठे चाललो आज मी
काय ठाव कुणास ।
चेहऱ्यावरती हसू मात्र
मन का हे उदास … ।।

- सिद्धेश्वर
 

* जिंदगी *

भंवरे से जरा पूछो तुम

उनकी जिंदगी कहा होती है।

मधुबन में फैलाके खुशबू

ये तित्‍तली कहा सोती है ।

*शिवराय*

.......... * शिवराय * ..........
धन्य ते शिवराय चला नमन त्यांना करू,
घडविले स्वराज्य स्वबळावर, केले एक सुराज्य सूरू ।।

घेतीले भवानीचे दर्शन , घेतली रायरेश्वरी शपत ।
झुगारीत सारी बंधने मार्गीला स्वराज्याचा विजयपथ ।।

लाख होते आक्रमक परि तो न डगमगला ।
जिंकिला तो सह्याद्री साद घातली गगनाला ।।

जिंकिला तो तोरणं राजगडाचे झाले रायगड ।
परि चित्ती होती त्याच्या मराठी जनमाणसाची ओढ ।।

कर्मठांच्या गर्दना उडविल्या, पडिल्या बंद त्या रिती ।
अन् 'साम दाम दंड भेद ' वापरली हि नीती ।।

दिली प्रेरणा संघर्षाची , अन्यायाशी लढण्याची ।
फिकीर नसे चित्ती त्याच्या कुण्या शत्रूच्या कापटकाव्याची ।।

रणी ठेवुनी होश दावीला मराठी जोष ।
अन् हर हर महादेवचा झाला सर्वत्रभू जयघोष ।।

असा होता वीर शिवाजी, तो आला त्याने जिंकिले ।
काळाने घाला केला , पण काळ मात्र आठवणीत राहिले ।।

-सिद्धेश्वर

*किस्मत*

................* * * किस्मत* * *................

करे तू लाख कोशिशे मगर किस्मत को न बदल पाये । 
किस्मत हि वो चीज ही जिसके बिन जिंदगी मे रंग न आये ॥ 

कहते है लोग किस्मत का कोई धनी नहीं होता ।
अरे बिन किस्मत का भी तो कोई धनी नहीं होता ॥ 

दूसरोंकी जीत को क्यूँ अपनी हार मान लेते हो । 
तुम भी जीत सकते थे ये क्यूँ भूल जाते हो ॥ 

अपनी हार को तुम बदकिस्मत मानते हो ।
फिर सदा किस्मत को कोसते रह जाते हो ॥

यदि कभी जरा अपने अतीत (ख़ुद) में झांककर तो देखो ।
किस्मत ने दिए कितने मौके कभी याद कर के देखो ॥

किस्मत को जिसने समजा आज वो सिकंदर है ।
नासमज है जो वो तो आज भी बन्दर है ॥

ठानलो किस्मत को कोसना नहीं उसपे हावी होना है ।
किस्मत का खेल समज़कर ही जिंदगी को जितना है ॥

- सिद्धेश्वर

Saturday 13 December 2014

IT'S YOU....!

IT'S YOU....!

Try try but never you cry...
. See the world with joyful eye...
It's you who have to rise...
. Don't give up be the wise...
It's you to catch the goal..
. Wake up yourself invoke your soul...
Remember such a work you have to do...
. That will be a memory in absence of you...
It's easy to blame than to match him...
. How can you know water unless u swim...
Life is a race with a way thorny..
. You've to face to destinate your journey...
Do it now just forget then...
. Step out to the world leave the ben ...
Remember no work as bullish..
. STAY HUNGRY,STAY FOOLISH...

                    -siddheshwar

प्रिय ताईस…

आठवते ते बालपण बोट धरुनी चालताना ,
इवल्याश्या या भावासमोर बाहुली बनूनी डोलताना ।
आजीच्या दहीभातातील तू गोड चव खरी 
आजोबांच्या गोष्टीतील तूच माझी सोनपरी ।
लहानसहान गोष्टींचंही तुला कुतूहल असायचं ,
परसातल्या पाखरांसाठी फूल होऊन बसायचं ।
मी केलेल्या खोड्या अन् त्या गमतीजमती,
तो गप्पांचा डाव अन् ती मैत्री तुझ्या संगती ।
रागावली आई तरी तुझं पाठीशी घालनं,
दादाच्या सर्वगोष्टी निपुटपने ऐकणं।
रुसवा काढायला दिलेला तुझा खाऊ,
हुंदके भरत निजताना तुझ्या कुशीत मऊ मऊ।
म्हणतात ना विरहानेच स्नेहभाव धृढ होतो,
आठवण तुझी येताच क्षणार्धात विरह दूर होतो।

-सिद्धेश्वर

।। मी मराठी ।।

......... ।। मी मराठी ।। ........

प्राण माझा मराठी , मान माझा मराठी ।
आण माझा मराठी , शान माझी मराठी ।
नसानसांतून सळसळणारे हे रक्त माझे मराठी ।।

जन्म माझा मराठी , वेश माझा मराठी ।
देश माझा मराठी , माय माझी मराठी ।
भवितव्याची स्वप्न पाहणारे नयन माझे मराठी ।।

श्वास माझा मराठी , ध्यास माझा मराठी ।
स्वप्न माझे मराठी , शब्द माझे मराठी ।
शिवरायांनी साकारलेले स्वराज्य माझे मराठी ।।

रंग माझा मराठी , रूप माझे मराठी ।
धर्म माझा मराठी , जात माझी मराठी ।
गोदेच्या पाण्यासम निर्मळ मन माझे मराठी ।।


- सिद्धेश्वर
 

गुमनाम

युहिं बहता चला मैं इन लहारोंमे ।
पतवार भी खोई ही कहि नहरोंमे ।
अब तो वो चांद भी है कही पहरोंमे । 
बस मैं ही गुम होता रहा इन नए शहरोंमें ॥ 
-सिद्धेश्वर